मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (09:18 IST)

बीडचा दुष्काळ हा भीषण आहे - मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करत आहेत. त्यांनी बीड येथे दुष्काळ पाहणी केली. यावेळी सर्व पाहून मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले की “बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा आज घेतला आहे. बीड जिल्ह्याचा दुष्काळ हा भीषणच आणि तीव्र स्वरूपाचा असून दुष्काळ निवारण आणि उपाययोजनासाठी तातडीने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, हाताला काम असो, जनावरांचा चारा असो की अजून पाण्याच्या योजना असो. तातडीने मार्गी लावल्या जाणार आहेत. सात हजार कोटी रूपयाच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. लवकरच केंद्राचे पथक येईल, तोपर्यंत राज्य सरकार मदतीचा ओघ सुरू ठेवेल”यावेळी अनेकांनी मुख्यमंत्री यांना निवेदने दिली तर पंकजा मुंढे यांनी सर्व स्थिती मुख्यमंत्री यांना दाखवली आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले की पाच तालुक्यात पाणी पोहचवता येईल, उर्वरित सहा तालुक्यामध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी आपल्याला काही अडचणीचा सामना करावा लागणार आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांना अनुदान देऊन काळपेर्‍यामध्ये चारा निर्माण करता येईल.पाणी पुरवठा योजनेला प्राधान्य देऊन ज्या अर्धवट पाणीपुरवठा योजना आहेत त्या लवकर पूर्ण केल्या जातील. परिस्थिती भीषण असून दुष्काळ उपाययोजनांसाठी आपण केंद्राकडे सात हजार कोटीचा प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी सांगितले. तर बोंडअळीचे अनुदान रूपाने २५६ कोटीची मदत दिली आहे. ८० टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले आहे.