शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (16:57 IST)

विद्यार्थ्यांला शाळेत मारहाण, मुलाला अर्धांगवायूचा झटका आल्याचा आरोप

पुण्यातील एसएसपीएमएस श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलीटरी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मुलाला अर्धांगवायूचा झटका आल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे.
 
प्रसन्न शैलेंद्र पाटील असं विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा इंदापूर तालुक्यातील रहिवास आहे. तो एसएसपीएमएस या शाळेत प्रसन्न इयत्ता 6 वीच्या वर्गात शिकतो. सोबतच याच शाळेच्या वसतिगृहात राहतो. दिवाळीच्या सुट्ट्यांपूर्वी शाळेतील अभ्यासक्रमाची चित्रकलेच्या विषयाची वही पूर्ण केली नाही. म्हणून शिक्षक संदीप गाडे यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली होती. हा प्रकार विद्यार्थ्याने भीतीपोटी कोणालाही सांगितला नाही. सुट्ट्या लागल्यानंतर त्याच्या पालकांना मुलाच्या चेहऱ्यात काही बदल झालेला दिसून आला. त्यांना त्याला दवाखान्यात नेल्यावर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे पालकांनी स्पष्ट केले आहे.