रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:58 IST)

कल्पना गिरी हत्या प्रकरण, आरोपीचा जमीन रद्द करा - शिवसेना आ. नीलम गोऱ्हे

कल्पना गिरी संशयस्पद मत्यू प्रकरणात एका आरोपीला मिळालेला जामीन रद्द करावा अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहोत अशी माहिती शिवसेना आ. निलम गोर्‍हे यांनी आजलातूरशी बोलताना दिली दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने लातुरात आयोजित महिला कायदेविषयक कार्यशाळेनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
 
गिरी कुटुंबियाच्या विनंतीवरुन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यालाही दोन वर्षे झाली. या प्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन खटला चालवावा यावे यासाठीही आपण गृहमंत्र्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे निलमताई म्हणाल्या.
 
लातूर शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकारी कल्पना गिरी यांची मार्च २०१४ मध्ये रंगपंचमीच्या दिवशी तुळजापूरनजीकच्या शिवारात हत्या करण्यात आली होती. प्रारंभी या गुन्हय़ाबाबतची तक्रार लातूरच्या एमआयडीसी पोलिसात देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही घटना घडल्यामुळे हे प्रकरण देशभर निवडणुकीत गाजले. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेत या प्रकरणाचा उल्लेख करत काँग्रेसवर तोफ डागली होती. या प्रकरणाचा तपास सीबाआयकडे द्यावा, अशी मागणी कल्पना गिरी यांच्या आई, वडील व भाऊ यांनी केली. त्यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन देण्याबरोबरच त्यांनी दिल्लीत धरणे आंदोलन केले होते.  या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.