Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सद्गुरु नाशिककरांशी येत्या 11 जूनला साधणार संवाद

Updated: गुरूवार, 2 जून 2022 (21:30 IST)
   
या जागतिक मोहिमेमध्ये सद्गुरू सोलो बाईक राईड करत 27 देशांत 100 दिवस यात्रा करत आहेत.  मार्च महिन्यामध्ये  ही जागतिक मोहीम सुरू केल्यानंतर सद्गुरू यांनी 30,000 कि.मी  प्रवास केला. दरम्यान, वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन नागरिक आणि नेत्यांपर्यंत माती वाचवाचा संदेश पोहोचविला आहे. २१ मार्चला लंडनमध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला आणि जूनच्या अखेरीस कावेरी नदीच्या खोऱ्यात संपणार आहे. 26 देशांना भेट देऊन नुकतेच त्यांचे जामनगर येथे भारतात आगमन झाले.  आता पुढे भारतातील विविध राज्यांत भेट दिल्यानंतर11जूनला ते नाशिकमध्ये येत आहेत.
 
सद्गुरू यांचे हे अभियान जागतिक अन्न संघटना आणि युनायटेड नेशन्स कन्झव्हेंशन टू कॉम्बैट डेजर्टिफिकेशन यांच्या माध्यमातून होत आहे. यूएनसीसीडी म्हणजे युनायटेड नेशन्स कन्झव्हॅशन टू कॉम्बैट डेजर्टिफिकेशन (UNCCD) ने त्यांच्या अहवालात भिती व्यक्त केली आहे की, 2050  सालापर्यंत जगभरातील सुमारे 90 टक्के मातीचा हास होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे अन्न सुरक्षा, पाण्याचा तुटवडा, दुष्काळ वातावरणातील बदल, स्थलांतरावर परिणाम होणार आहे. म्हणूनच मातीचे संवर्धन केले तर हे प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी ‘माती वाचवा' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जगभरातील किमान साडेतीन अब्ज किंवा 60 टक्के लोकांमध्ये मातीच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हे मोहिमेचे ध्येय आहे. 
 
माती वाचवा मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट जगातील सर्व राष्ट्रांना तातडीच्या धोरणात्मक सुधारणांद्वारे शेतजमिनीत किमान 3-6% सेंद्रिय सामग्री अनिवार्य करण्यासाठी प्रेरित करणे आहे. मृदा शास्त्रज्ञांनी या किमान सेंद्रिय सामग्रीशिवाय मातीच्या विनाशाचा इशारा दिला आहे, ज्याला ते ‘मातीचे नामशेष होणे’म्हणून संबोधत आहेत. भारतामध्ये, शेतजमिनिवारच्या मातीत सरासरी सेंद्रिय सामग्री 0.68% असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे देशाला वाळवंटीकरण आणि माती नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. देशातील सुमारे 30% सुपीक माती आधीच नापीक बनली आहे आणि उत्पादन देण्यास असमर्थ आहे. असा अंदाज आहे की, जागतिक स्तरावर सुमारे 25% सुपीक जमीन ओसाड झाली आहे. युनायटेड नेशन्सने चेतावणी दिली आहे की सध्याच्या मातीच्या ऱ्हासाच्या दरानुसार आतापासून तीन दशकांपेक्षा कमी काळात - 2050 पर्यंत पृथ्वीचा 90% भाग वाळवंटात बदलू शकतो.
 
माती नष्ट झाल्यामुळे जगभरात अभूतपूर्व पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक आपत्ती येऊ शकतात. यामध्ये तीव्र होणारे हवामान बदल, जागतिक अन्न आणि पाण्याची टंचाई, भीषण नागरी संघर्ष आणि प्रत्येक राष्ट्राची सुरक्षा आणि सांस्कृतिक रचना धोक्यात आणणाऱ्या स्थलांतरचा समावेश आहे.
माती वाचवा, ही माती आणि ही धरती वाचविण्यासाठी एक सजग दृष्टीकोणाची प्रेरणा देणारी जागतिक चळवळ आहे. ही पहिली आणि अग्रगण्य अशी  लोक चळवळ आहे. जगातील 3.5 अब्ज लोकांचा पाठींबा मिळवून (जगात मतदानाचा अधिकार असणाऱ्या 60% लोकसंख्येपेक्षा जास्त) जगभरातल्या शासनांना मातीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास थांबवण्यासाठी धोरणात्मक बदल करण्यासाठी प्रेरित करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. जागतिक नेते, प्रभावशाली व्यक्ती, कलाकार, शेतकरी, तज्ञ, आध्यात्मिक नेते, NGOs आणि सामान्य जनता, हे पुढे येऊन माती सोबत मानवतेचा संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या मोहिमेला पाठींबा देत आहेत.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये समोसे आणि पकोड्यांवर बंदी

अपहरण करून जिवंत जाळले... गरोदर मंजीत यांची मृत्यूशी झुंज अपयशी, १.४६ लाख फॉलोअर्स असलेल्या मंजीत कौर कोण होत्या ?

'सावधान! नेपाळमधून वाहून आलेल्या माशांचे सेवन करू नका' – भारतातील या राज्यात ही सूचना का जारी करण्यात आली आहे?

सर्वोत्तम बॅटरी लाईफ असलेले टॉप 5 स्मार्टफोन, जाणून घ्या किती तासांचा बॅकअप मिळणार

आजीला घातला आपला ४०,००० रुपयांचा Dior चा गॉगल, हात धरून फिरणाऱ्या मुख्यमंत्री विजय यांच्या कृतीने जिंकली मनं

पुढील लेख
Show comments