शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (14:47 IST)

मुख्यमंत्र्यांचे शिक्षक-पालक -विद्यार्थ्यांशी संवाद, आता शाळा बंद पडू नये या नव्या निर्धाराने सुरुवात करा

राज्यात आजपासून शहरी भागात 8 वी ते 12 वी आणि ग्रामीण भागात 5 वी  ते 8 वी चे वर्ग सुरु होणार आहे.आज पुन्हा तब्बल दीड वर्षा नंतर शाळेची घंटा वाजणार आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालक-शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी वर्चूव्हल पद्धतीने संवाद साधला. त्यांनी पालकांना आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच एकदा सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होऊ नये असे देखील आवाहन त्यांनी केले आहे. खरं तर कोरोनाच्या प्रादुर्भावाला बघता शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणे अवघड होते.परंतु राज्यातील टास्क फोर्सशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना नवीन उत्साह असतो.आपल्या सवंगडी सहपाठींना,मित्रांना भेटण्याची ओढ असते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावाला बघता काही नियमांचे पालन करणे शिक्षक आणि पालकांसाठी बंधन कारक आहे. त्या साठी नियमावली काढण्यात आली आहे. या साठी पालकांना आणि शिक्षकांना  विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेण्यास सांगितले आहे. मुलांना आणि पालकांना आणि शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या.मुलांनी देखील कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आता सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद होऊ नये.असे ही त्यांनी सांगितले आहे.