सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (13:26 IST)

हृदयद्रावक ! 12 वर्षीय मुलासह गोदावरीत बुडून दोघांचा दुर्देवी अंत

नाशिक मध्ये गोदावरी नदीत चिमुकल्यासह बुडून तिघांचा दुर्देवी अंत झाला त्यात एक बारा वर्षाच्या मुलासह दोन तरुणांचा समावेश आहे.ही दुर्देवी घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली इथे उत्तमनगर मधील गणेश कॉलोनीतील महाजन कुटुंब देवाच्या दर्शनास आले असताना राव साहेब महाजन (36)यांचा पाय घसरून नदीपात्रात पडले.पाण्याची पातळी जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले त्यांना वाचविण्याचा आणि शोध घेण्याचा जीवरक्षक जवानांनी प्रयत्न केला परंतु त्यांच्या हाती त्यांचा मृतदेहचं लागला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी, आई,वडील,भाऊ, बहीण,असा भला मोठा परिवार आहे. 

दुसरी घटना राव साहेब महाजन यांच्या शोध घेताना जीव रक्षक जवानांना एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. ओवेस नदीम खान (18)वर्ष असे या तरुणाचं नाव आहे.तिसरा मृतदेह नाशिक मधील साहिलचा आढळला तो घरातून कोणालाही न सांगता पोहण्यासाठी गेला होता. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.