Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर्स सेल सरसावले

Updated: मंगळवार, 22 मे 2018 (15:05 IST)

नुकत्याच जे.जे.रूग्णालयात घडलेल्या घटनेत निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डॉक्टर सेलचे प्रतिनिधी आज जखमी डॉ. अतिश व डॉ. शाल्मली यांना भेटले व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी जे.जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ननंदकर सर यांच्यासोबत चर्चा करून इमर्जन्सी अलार्म सिस्टीम तसेच प्रत्येक मजल्यावर एक सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला. तसेच मार्डचे अध्यक्ष डॉ. संग्राम यांना भेटून डॉक्टर्सच्या सुरक्षिततेसाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे जाहीर केले व अधिष्‍ठातांकडे निवेदन सुपूर्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, डॉक्टर सेलच्या शिष्टमंडळात डॉ. शिवदास भोसले (प्रदेश उपाध्यक्ष), डॉ. किरण देशमुख (प्रदेश सचिव) डॉ. रिना मोकल (अध्यक्ष उत्तर मुंबई) व डॉ. निरज शहा इ. चा समावेश होता.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

१ रुपयात १ किमी धावणार! ७ सीटर मारुतीची नवी 'इलेक्ट्रिक MPV' येतेय; जाणून घ्या डिटेल्स

Sri Lanka vs India: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गॉलमध्ये दाखल झाला; खेळाडूंचे भव्य स्वागत

Independence Day 2026 Slogans १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन घोषवाक्य

"ED-CBI च्या धाकानेच शिवसेना फोडली!" कपिल सिब्बल यांचा न्यायालयात खळबळजनक दावा

LIVE: ED आणि CBI ची धाक दाखवून शिवसेनेत फूट पाडण्यात आली; कपिल सिब्बल यांचा मोठा आरोप

पुढील लेख
Show comments