suvichar

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोणाचे आमदार अपात्र ठरणार? निकाल थोड्याच वेळात

Updated: बुधवार, 10 जानेवारी 2024 (15:31 IST)
 
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत शिवसेनेच्या आमदारांची सुनावणी पूर्ण झाली. त्याचा निकाल आज संध्याकाळी चार वाजता राहुल नार्वेकर वाचून दाखवतील.
 
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 'असा' लागणार
10 जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील.
 
विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडेल. या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी झाल्यास विलंब होईल म्हणून याची विभागणी सहा गटात करण्यात आली होती. यामुळे याचिकांच्या या सहा गटांचे सहा स्वतंत्र निकाल वाचून दाखवले जातील.
 
परंतु हे सहा निकाल एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतील.
 
हा निकाल साधारण 1200 पानांचा असेल. याचिकेच्या प्रत्येक गटाचा निकाल 200 पानांहून अधिक आहे. निकालादरम्यान केवळ यातील ठळक मुद्दे अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील. या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे याचिकाकर्ते आणि वकिलांना बोलवलं जाईल.
 
हा निकाल अध्यक्ष वाचून दाखवतील परंतु सर्वोच्च न्यायालयाला पाठवण्यात येणार नाही. या निकालाला दोन्हीपैकी एका गटाकडून आव्हान दिल्यास प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल.
 
या निकालात चार महत्त्वाच्या गोष्टी यापुढील सर्व अशा प्रकरणांसाठी स्पष्ट होतील असा दावा विधिमंडळ कार्यालयातील सुत्रांनी केला आहे.
 
1. पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
 
2. सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील.
 
3. अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.
 
विधिमंडळ कार्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "लोकांनी जो गृहीत धरलेला आहे तसा निकाल नसेल. निकालात समतोल साधलेला असेल."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात ५,००० नवीन लालपरी बसेस धावणार

मुंबईत अमित शाह यांची मोठी घोषणा, २०२९ पूर्वी २१ राज्यांमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू केली जाईल

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशव्यापी 'सेवा संकल्प अभियान'; अमित शाह यांची मुंबईत घोषणा

Maharashtra ST New Buses महाराष्ट्रात ५,००० नवीन लालपरी बसेस धावणार

Hindi Diwas 2026 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments