शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2024 (13:13 IST)

नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, टँकरचालकांचे पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलन

truck strike
हिट अँड रन कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. नाशिकच्या पानेवाडी इंधन प्रकल्पात चालक टँकर घेऊन आले नाही. त्यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यात इंधन पुरवठा बंद झाला आहे. 

केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यामुळे टँकर चालकांमध्ये नाराजगी असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यात टँकर चालकांनी संप पुकारला  होता. आता नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मध्यरात्री पासून या आंदोलनावर काहीच तोडगा न निघाल्यामुळे संप होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्ये रात्री पासून अचानक टँकर चालकांनी आंदोलन सुरु केलं आहे.मात्र संपाची जबाबदारी कोणत्याही वाहतूकदार संघटनेने स्वीकारली नाही. 

केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यामध्ये अपघातासाठी केलेल्या कायद्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि सात लाखाच्या दंडाची तरतूद केल्याने टँकर चालकांनी असे कायदे अन्यायकारक असल्याची तक्रार केली होती. यावर तोडगा म्हणून संप जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मध्यस्थीने संप यशस्वीपणे मिटवले होते. आता पुन्हा टँकर चालकांनी हे आंदोलन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
 Edited by - Priya Dixit