शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 7 जानेवारी 2024 (10:12 IST)

नाशिक : लोकमान्यकडून भोंसलामधील विद्यार्थ्यांसाठी 1 कोटींची देणगी जाहीर

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड नेहमीच राष्ट्र विकास या मूल्याला महत्व देत आले आहे. किंबहुना हा लोकमान्यच्या कामाचा अविभाज्य भाग आहे. हीच परंपरा कायम राखत लोकमान्यकडून सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या (भोंसला) नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी 1 कोटींची देणगी जाहीर केली आहे.लेफ्टिनेंट जनरल (सेवानिवृत्त) डीबी शेकटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन दरवर्षी गुणवंतांच्या यादीत पहिला येणारा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना या देणगीच्या व्याजातून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याबाबतची कार्यालयीन कागदपत्रांची पुर्तता नुकतीच करण्यात आली असून भोंसलाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. आगामी वर्षांपासून ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
 
यावेळी लोकमान्यच्या संचालिका सई ठाकूर – बिजलानी, लोकमान्यचे सल्लागार प्रीतम बिजलानी, नाशिक क्षेत्रिय व्यवस्थापक हेमंत फडके, बांधकाम व्यवसायिक श्वेता कोठारी, भोंसलाचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश भिडे, सचिव हेमंत देशपांडे, सहसचिव माधव बर्वे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.       
 
या शिष्यवृत्तीबाबत लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी सांगितले की, भोंसला देशाची युवा पिढी घडविण्याचे महत्वाचे कार्य यशस्वीरीत्या करत आहे. तेव्हा या कार्यात आपलाही सहभाग असावा या विचारातून लेफ्टिनेंट जनरल (सेवानिवृत्त) डीबी शेकटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. यामुळे गरजू विद्यार्थ्यांला मदत होणार असून त्याचा प्रगतीचा मार्ग सुकर होणार आहे. अभ्यास करतांना फी भरण्याचा असलेला ताण कमी होईल. सोबतच लोकमान्यचे भारतीय लष्करासोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. लष्करात कार्यरत असलेल्या आजी माजी जवान, शहीद जवानांच्या विधवा पत्नी यांना लोकमान्यचे ठेवीदार बनल्यानंतर अर्धा टक्का अधिक व्याज दिले जाते. या शिष्यवृत्तीमुळे हे नाते आता नक्कीच अधिक दृढ होत आहे.      
 
लोकमान्यच्या संचालिका सई ठाकूर – बिजलानी यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, देशाच्या विकासात लोकमान्यने नेहमीच आपली जबाबदारी उचलली आहे. याआधीही सुद्धा अनेक माध्यमातून लोकमान्य जनसेवा करत आली आहे. बेळगावमध्ये असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या संग्रहालयाचे संवर्धन, शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी, दान स्वरूपात रुग्णवाहिका अशा स्वरूपात लोकमान्यने नेहमीच मदत केली आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून लोकमान्यला लष्कराची सेवा करण्याची संधी मिळत असते अशी आमची भूमिका आहे.  

Edited by -Ratnadeep Ranshoor