शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कोंबड खताच्या वासाने मादी बिबट, पिल्ला सह थेट मळ्यात, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण...

leopard
नाशिक :  कोंबड खाताच्या वासाने मादी बिबट आपल्या पिल्ला सह सकाळी थेट मळ्यात आल्याने शेतकरी व मजूर यांची एकच धांदल उडाली.
 
पंचक मनपा शाळेमागे अवडाई नगर येथे हेमंत भगीरथ बोराडे यांची शेती आहे. आजूबाजूचा संपूर्ण भाग शेतीचा आहे. काही ठिकाणी उस लागवड केली आहे.
 
हेमंत भगीरथ बोराडे यांच्या शेतात शिमला मिर्ची लावण्यासाठी शेती ला चारही बाजूने नेट लावून शेतीची मशागत सुरु होती. त्या साठी बोराडे यांनी वावरात सोमवारी कोंबड खत टाकले होते.
 
मंगळवारी सकाळी बोराडे परिवार व काही कामगार मळ्यात जात असतांना त्याना वावरात लावलेल्या नेट च्या बाजूने जनावर जाताना दिसले. सुरवातीला त्यांना ते रानडुक्कर असेल असे वाटले.  मात्र मजुराने काही अंतरावरून पाहिले असता तो मादी जातीचा बिबट्या व सोबत एक पिल्लू असल्याचे दिसल्याने सर्वांनी तेथून पळ काढला.
 
वन विभागाच्या अधिकारी यांनी घटनास्थळ पाहणी  केली असून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. शेतकरी, मजूर यांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.