शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जानेवारी 2024 (09:52 IST)

जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात जन्मठेप भोगणाऱ्या हिमायत बेगला जामीन

court
पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या हिमायत बेगला मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. पण हा जामीन त्याला नाशिकच्या दहशतवादी कारवायांप्रकरणी देण्यात आला आहे.
 
हिमायत बेगवर नाशिक इथं दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन यूएपीए अर्थात बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडं या प्रकरणाचा तपास असून बेगवर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांची नियुक्ती करण्याचं काम करत असल्याचा आरोप आहे.
 
दरम्यान, पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरी बाहेर बॉम्बस्फोट घडवून आणला गेला होता. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला होता तर ६० हून अधिक जण जखम झाले होते. या स्फोटाचा सूत्रधार हा हिमायत बेग हाच होता.

Edited By - Ratnadeep ranshoor