बुधवार, 16 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (21:20 IST)

बाप्परे, विजेच्या तारांनी घेतला जीव, तारा ट्रकवर पडल्याने दोघांचा मृत्यू

death
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पालखेड ते दावचवाडी रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा ट्रकवर पडल्याने यात शॉक लागून ट्रक ड्रायव्हर पारसनाथ गणपत पाल व हमाल विजय प्रल्हाद शिंदे या दोघांचा मृत्यू झाला. शेतात खत खाली करण्यासाठी ट्रक जात असतांना ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास घडली.
 
दावचवाडी येथे गुरुवारी सकाळी ट्रक मुंबईहून शेणखत घेऊन पिंपळगाव बसवंत मार्गे दावचवाडी येथे आला. या ठिकाणी ट्रकचालकाने शेणखत खाली करण्यासाठी हमाल पप्पू सोमनाथ यादव व विजय प्रल्हाद शिंदे यांना गाडीमध्ये बसवले. त्यानंतर पालखेड शिवारातील शेतकरी बाळासाहेब आहेर यांच्या शेतात जात असतांना लोंबकळलेल्या वीजवाहक तारेचा ट्रकला धक्का लागला. त्यामुळे ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यात टायर फुटले व चालक व हमाल बाहेर फेकले गेले. तर दुसरा हमाल पप्पू यादव याने उडी मारल्यामुळे तो बचावला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याआधीही  महावितरणकडे तक्रार करुनही लोंबकळणाऱ्या  वीजतारा उचललेल्या गेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. या तारा वरती उचलाव्या अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. 
Edited by : Ratnadeep Ranshoor