शनिवार, 26 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (15:42 IST)

फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि फडणवीस यांचा गॅलरीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अचानक या दोन नेत्यांमध्ये भेट झाली असल्यामुळे युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. परंतु ही भेट कौटुंबीक असल्याचेही सांगितले जात आहे. 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर निवासस्थानी भेट झाली आहे. आगामी निवडणुकांपुर्वीच राज ठाकरे यांची फडणवीसांनी भेट घेतली असल्यामुळे चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. फडणवीस अचानक राज ठाकरेंच्या नव्या घरी दाखल झाले. या भेटीमध्ये राज-फडणवीस यांच्यात चांगल्याच गप्पा गोष्टी झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान घराच्या गॅलरीमध्ये दोन्हे नेते आले होते त्यावेळीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हास्यविनोद करत असल्याचे दिसत आहे.