सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (15:50 IST)

नारळ फोडल्याने कुटुंबाचा बहिष्कार

निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावातमध्ये मंदिरात नारळ फोडणे या क्षुल्लक कारणावरुन गावातील संपूर्ण समाजानेच या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. तब्बल तीन दिवस या कुटूंबाला गावकऱ्यांनी वाळीत टाकले होते.  
 
बहिष्कार टाकल्यानंतर सदरील कुटूंबातील सदस्यांना साधे पीठही दळून दिले नसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ नंतर पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर हे बहिष्कार प्रकरण मिटले आहे. पण एका समाजातील तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानेच हा प्रकार घडला आहे. 
अद्याप याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही पण या प्रकरामुळे संताप व्यक्त होत आहे.