नाशिक: तलवारीने कापला बर्थडेचा केक; सेलिब्रेशन थेट पोलीस ठाण्यात

crime news
Last Modified शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:32 IST)
मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थ नगर येथील एका युवकास वाढदिवशी तलवारीने केक कापणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद, सिद्धार्थ नगर येथे संशयित मयूर पितांबर सोनवणे (वय २६) यांच्याकडे तलवार असल्याची माहिती सोशल मीडियाव्दारे म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांना मिळाली होती.

त्यानुसार म्हसरुळ गुन्हे शोध पथक अधिकारी व कर्मचारी यांनी संशयित मयूर यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली. विशेष म्हणजे मयूर सोनवणेवर कोरोना काळातदेखील रेमडीसिव्हर सापडल्याने गुन्हा दाखल होऊन जेलवारीदेखील झाली होती.
संशयित मयूरचा मंगळवारी (दि.१९) वाढदिवस होता. यावेळी त्याचे मित्र परिवार केक घेऊन आले. परंतु मयूर यांनी हा केक मित्रांसमवेत तलवारीने कापला. याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे छायाचित्र एका सामजिक कार्यकत्याने पोलीस व नागरिक मिळून तयार केलेल्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर शेअर केले. ते पाहून वरिष्ठ निरीक्षक सूर्यवंशी यांनी म्हसरुळ पोलिसांसह संशयितास ताब्यात घेऊन त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

महाराष्ट्र कोविड: BA4 आणि Omicron च्या 5 उप प्रकारांची ...

महाराष्ट्र कोविड: BA4 आणि Omicron च्या 5 उप प्रकारांची प्रकरणे महाराष्ट्रात आली, पुण्यात 7 रुग्ण आढळले
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 325 रुग्ण बरे ...

मुंबई : मनसेचा मेळावा पार

मुंबई : मनसेचा मेळावा पार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे कामाला लागले आहे. आज ...

WhatsApp युजर्ससाठी घेऊन येत आहे अप्रतिम फीचर, तुम्ही इतर ...

WhatsApp युजर्ससाठी घेऊन येत आहे अप्रतिम फीचर, तुम्ही इतर फोन किंवा टॅबवरूनही चॅटिंग करू शकाल
WhatsApp युजर्ससाठी घेऊन येत आहे अप्रतिम फीचर, तुम्ही इतर फोन किंवा टॅबवरूनही चॅटिंग करू ...

World Menstrual Hygiene Day 2022 : 1 रुपयांत दहा सॅनिटरी ...

World Menstrual Hygiene Day 2022 : 1 रुपयांत दहा सॅनिटरी नॅपकिन!
राज्यातील 60 लाख महिलांना नाममात्र 1रुपयात 10 सॅनिटरी नॅपकिन/ सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) ...

फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात ...

फँस सज्ज व्हा, रणवीर सिंग IPL 2022च्या समारोप समारंभात परफॉर्म करणार आहे
यंदाच्या आयपीएलच्या समारोप सोहळ्यात रणवीर सिंग परफॉर्म करणार आहे. तो 29 मे रोजी ...