Festival Posters

नाशिक: तलवारीने कापला बर्थडेचा केक; सेलिब्रेशन थेट पोलीस ठाण्यात

शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021 (22:32 IST)
मखमलाबाद शिवारातील सिद्धार्थ नगर येथील एका युवकास वाढदिवशी तलवारीने केक कापणे चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद, सिद्धार्थ नगर येथे संशयित मयूर पितांबर सोनवणे (वय २६) यांच्याकडे तलवार असल्याची माहिती सोशल मीडियाव्दारे म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांना मिळाली होती.
 
त्यानुसार म्हसरुळ गुन्हे शोध पथक अधिकारी व कर्मचारी यांनी संशयित मयूर यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली. विशेष म्हणजे मयूर सोनवणेवर कोरोना काळातदेखील रेमडीसिव्हर सापडल्याने गुन्हा दाखल होऊन जेलवारीदेखील झाली होती.
 
संशयित मयूरचा मंगळवारी (दि.१९) वाढदिवस होता. यावेळी त्याचे मित्र परिवार केक घेऊन आले. परंतु मयूर यांनी हा केक मित्रांसमवेत तलवारीने कापला. याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे छायाचित्र एका सामजिक कार्यकत्याने पोलीस व नागरिक मिळून तयार केलेल्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर शेअर केले. ते पाहून वरिष्ठ निरीक्षक सूर्यवंशी यांनी म्हसरुळ पोलिसांसह संशयितास ताब्यात घेऊन त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईत बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा आढावा घेतला

महिला शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय!; जमीन नसतानाही शासकीय योजनांचा लाभ मिळणार

कॉकरोच जनता पार्टीकडून 'प्रधान गो बॅक' मोहिमेची घोषणा; २८ जून रोजी जंतर मंतरवर देशव्यापी आंदोलन

तुमच्या पालकांना या फसवणुकीबद्दल सांगा, नाहीतर बँक खाते एका क्लिकमध्ये रिकामे होऊ शकते

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १,७२२ कोटी रुपयांच्या नवीन रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments