सोमवार, 24 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 नोव्हेंबर 2025 (16:39 IST)

सोलापूर–हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघातात पाच जणांचा दुर्देवी मृत्यू

accident
सोलापूर–हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथील (Accident News)अणदूर परिसरात शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून यापैकी दोन महिला पुण्यातील आहे. 
शनिवारी सकाळी क्रुझर जीप सोलापुरातून नळदुर्गकडे देवदर्शनाला जात असताना अचानक टायर फुटून अनियंत्रित झाली आणि रस्त्यावरून जात असणाऱ्या ट्रॅक्टरला जाऊन धडकली आणि पलटी झाली. या अपघातात वाहनाचा चेंदामेंदा झाला.
 ALSO READ: मुंबईतील धारावी येथे झोपड्यांना भीषण आग; वांद्रे ते माहीम दरम्यान लोकल ट्रेन सेवा बंद
अपघातात पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. या मध्ये तीन पुण्यातील महिलांचा समावेश आहे. या अपघातात सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी सोलापुरात रेफर केले आहे. 
Edited By - Priya Dixit