suvichar

पीएफआय'च्या पाच सदस्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Updated: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (08:33 IST)
 
देशभरात एकाचवेळी सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेला पहाटेच्या सुमारास ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) आदेशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी हे धाडसत्र राबविले होते.

नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८, रा. कोंढवा, पुणे), रझी अहमद खान (३१, रा. आशोका म्युज, कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) या पाच सदस्यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांची कोठडीची मुदत सोमवारी (दि.३) संपल्याने पथकाने त्यांना कडेकोट बंदोबस्तात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी एटीएसचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. यावेळी मिसर यांनी एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाची प्रगती न्यायालयाला सांगितली. तसेच तपासात राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड करणाऱ्या आक्षेपार्ह बाबी समोर आल्याचेही पुराव्यांसह सांगण्यात आले. यामुळे न्यायालयाने पाचही संशयितांना पुन्हा चौदा दिवसांकरिता एटीएसच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

पंतप्रधान मोदींनी ब्रिक्समध्ये पुतिन, जिनपिंग आणि पेझेश्कियन यांच्यासोबत लावलेल्या मोठ्या डावचा ट्रम्प यांच्यासाठी काय अर्थ आहे?

अमेरिकेतील निवडणुकीतील मोठी बाजी: ट्रम्प यांची घोषणा - प्रत्येक प्रौढ नागरिकाला ५००० डॉलर्स मिळतील

जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक बनण्याचा मान मिळवला

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या भावाला आणि पुतण्याला शेतजमिनीच्या वादातून मारहाण

LIVE: भाजप आमदाराचा दावा, रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात

पुढील लेख
Show comments