रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (08:15 IST)

माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास शिंदे-फडणवीस जबाबदार-खासदार राजन विचारे

rajan vichare
खासदार राजन विचारे यांनी खळबळजनक आरोप केला आहे. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असं राजन विचारे यांनी म्हंटलं आहे. या संदर्भात राजन विचारे यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देखील पाठवलं आहे.
 
राजन विचारे यांनी पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या सूचनेनुसार पोलीस सरंक्षणात कपात केल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असतील. माझ्या पोलीस संरक्षणात वाढ करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
 
"महाराष्ट्र शासनानं सूडबुद्धीने माझी सुरक्षा काढली आहे. मी रात्री-अपरात्री माझ्या मतदारसंघांमध्ये फिरत असतो. अशा वेळेस माझ्यासोबत कुठलाही प्रकारची दुर्घटना घडल्यास किंवा हल्ला झाल्यास अथवा माझ्या कुटुंबीयांना काही धोका निर्माण झाल्यास याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील", असं राजन विचारे यांनी म्हटलं आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor