Daily Horoscope

कोकणात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

Updated: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (12:55 IST)
 
राज्याच्या विविध भागांत नद्यांना पूर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली. पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून ‘एनडीआरएफ’च्या मुंबईत पाच, सातारा, ठाणे, पालघर, नागपूर, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
 
मुंबई, कोकण आणि कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. तसेच पावासाने आतापर्यंत दोन लोकांचा बळी घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला असून मुंबईत मस्जिद बंदर येथे विजेच्या धक्क्याने रेल्वेचा एक कर्मचारी ठार झाला. 
 
अतिवृष्टीत अडचणीत सापडलेल्या लोकांना तातडीने मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले आहेत.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबई मेट्रो लाईन ३ ची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार

मुंबई आणि पुणे दरम्यान हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याची केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

LIVE: मुंबई आणि पुणे दरम्यान हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या विकासाची घोषणा

नाशिकच्या आश्रमातील शाळेत ८ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

नागपूरमध्ये स्वयंपाकाच्या वादातून पतीने पत्नीला मारहाण करून ठार केले

पुढील लेख
Show comments