1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (16:33 IST)

राज्यात अवकाळी पाऊसाचा अंदाज

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा कायम असून 24 तासांत पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्यात येत्या 24 तासांत अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेली चक्रवाताची परिस्थिती आता ओसरत आहे. मात्र दुसरीकडे उत्तर केरळपासून दक्षिण गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे.
 
 मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात येत आहे. मात्र तरीही काही अंशी गारवादेखील टिकून आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईकर पाऊस, गारवा आणि किंचित उकाडा अशा तिहेरी वातावरणाला सामोरे जात आहेत. मुंबईत पुढील 24 तास असंच वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. मुंबईचं कमाल तापमान 33 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं आहे.