Marathi Biodata Maker

अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू

बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (09:26 IST)
मागील काही काळापासून जळगावसह (Jalgaon) उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत असल्याने जळगावमध्ये सोमवारी तापमानाचा पारा 7.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. अशात अतिथंडीमुळरे चार जणांचा बळी गेला आहे. रात्रीच्या सुमारास सुटलेले थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
संबंधित चारही जण जळगाव शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मृत चौघेही निराधार आणि बेघर आहेत. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला झोपले होते.  सोमवारी रात्री ते शहरातील विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौकात, दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर तिसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात आढळला आहे. तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला आहे.
 
संबंधित चारही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चारही जणांना मृत घोषित केलं आहे.  

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

६० सेकंदात दोन प्रचंड भूकंप: व्हेनेझुएलातील अनेक शहरे ढिगाऱ्याखाली; हजारो लोक अडकल्याची भीती!

LIVE: राज्यात हॉटेल्सना ग्राहकांना मोफत पाणी द्यावे लागणार; कुकिंग ऑईलच्या पुनर्वापरावरही बंदी!

राज्यात हॉटेल्सना ग्राहकांना मोफत पाणी द्यावे लागणार; कुकिंग ऑईलच्या पुनर्वापरावरही बंदी!

कॉर्पोरेट क्षेत्रातील धर्मांतराला आळा; महाराष्ट्र सरकार स्थापन करणार विशेष समिती!

Renault Kiger चे नवीन व्हेरिएंट्स भारतात लाँच: शक्तिशाली इंजिन, किंमती आणि वैशिष्ट्ये

पुढील लेख
Show comments