Biodata Maker marathi
✕

दापोली : मित्रांनेच केला मित्राचा खून

Updated: गुरूवार, 5 जानेवारी 2023 (08:31 IST)
 
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, २ जानेवारी रोजी करंजाळी येथे अनिल रामाणे हे शेतीचे कवळ तोडण्यासाठी गेले असता त्यांना एका पुरुषाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. त्यांनी ही बाब पोलीस पाटील प्रकाश मोरे यांना सांगितली. मोरे यांनी याची माहिती दापोली पोलिसांना दिली. त्यानंतर हा मृतदेह सुशांत परब याचा असल्याचे निष्पन्न झाले. आकस्मिक मृत्यूची पोलिसांत नोंद केली होती. तपासा दरम्यान सुशांत त्याच्या आजीकडे करंजाळी डिंगणकरवाडी येथे रहात होता. त्याचा अंधेरी (मुंबई) येथील मित्र जयकिसन ओमप्रकाश सिंग हा १ जानेवारी रोजी रात्री करंजाळी येथे त्याला भेटायला आला होता.
 
रात्रीचे जेवण करून दोघे बाहेर पडले. त्यानंतर जयकिसन याने सुशांतचा काटा काढला. त्याच्या अंगावरील सर्व कपडे झाडावर अडकवून ठेवले. त्यानंतर जयकिसन सकाळी सुशांतच्या घरी आला व त्याच्या आजीला आपण मुंबईला जात असल्याचे सांगून बाहेर पडला. दरम्यान सुशांतचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.
मोबाईल कॉलच्या लोकेशनवरून जयकिसनला खेड येथील लॉजमधून ताब्यात घेतले. जयकिसन याला अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नागपूरचे नाव 'दीक्षाभूमी' करा, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित बारामती दौरा तूर्तास रद्द; आता शरद पवारांच्या हस्तेच होणार प्रेरणास्थळाचे उद्घाटन

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने पंढरपूर येथे मोठी कारवाई केली

महाराष्ट्र सरकार आगामी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायदा' सादर करणार

लग्नाचे आमिष दाखवून १४ महिलांचे शोषण केले; आरोपीचे युएईमधून भारतात प्रत्यार्पण

पुढील लेख
Show comments