Daily Horoscope
✕

चला विठू दर्शनाला, मात्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना करोना नियमांचे पालन बंधनकारक

Updated: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (23:01 IST)
 
या बैठकीत सरकारचे करोना बाबतचे सर्व नियमाचे पालन करण्यात येणार आहे. वय वर्षे दहा वर्षाच्या आतील, ६५ वर्षापुढील, गर्भवती महिला यांनी दर्शनासा येण्याचे टाळावे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे तापमान तपासले जाणार आहे. तसेच दर्शन रांगेत भाविकांनी मुखपट्टी,योग्य अंतर, सॅनिटायझर आदी नियम बंधनकारक आहे. तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क राहणार आहे. मंदिर भाविकांसाठी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खूले राहणार आहे. यात दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत स्थानिक भाविकांना,नवरात्रोसत्वात महिलांना याचा लाभ घेता येईल.
 
दि ७ ऑक्टोबरपासून दर्शनासाठी http://www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून तारीख, वेळ निश्चित करता येईल. तसेच इथे आल्यावर मुख दर्शनाची रांग कासार घात येथून सुरु होणार आहे. त्या ठिकाणाहून दर्शन घेता येईल. तसेच मंदिरात दर्शनासाठी येताना हार, फुले, नारळ, प्रसाद घेवून जाण्यास बंदी केली आहे. मंदिर, दर्शन रांग वेळोवेळी फवारणी आणि स्वच्छ केले जाणार असल्याची माहिती गुरव यांनी दिली आहे. तसेच मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. 
 
देवाचे नित्योपचार सर्व ज्या त्या वेळेनुसार आणि परंपरेनुसार होणार. भाविकांनी संकेतस्थळावरून बुकींग करून, अथवा समक्ष येऊन दर्शनाला यावे. मात्र गर्दी करू नये. मंदिर समितीने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली आहे. येणाऱ्या भाविकांनी देखील सरकारच्या नियमाचे पालन करावे. जर कोणाला काही त्रास झाल्यास मंदिर समितीला सांगावे त्वरित वैद्यकीय मदत केली जाईल. 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

भुंकणाऱ्या कुत्र्यापासून वाचण्याचा प्रयत्नात ३ वर्षाच्या चिमुकलीवर पडले उकळते दुध; उपचारादरम्यान मृत्यू

हिंगोलीत मालमत्तेच्या वादातून पुतण्याने काका आणि काकुंवर केले चाकूने वार; दोघांचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र दुष्काळाच्या तडाख्यात असताना लातूरमध्ये शेतात आग लागल्याने उसाचे संपूर्ण पीक जळून खाक

महाराष्ट्र SIR प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, केंद्र, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस

जळगावात स्वयंपाकाच्या वादातून मुलाचा आईवर लोणच्याच्या बरणीने हल्ला; माऊलीचा जागीच मृत्यू

पुढील लेख
Show comments