मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:21 IST)

खळबळजनक ! काँग्रेस शहर अध्याक्षाच्या घरात रंगला जुगाराचा अड्डा, 14 जणांना ठोकल्या बेड्या

यवतमाळ येथील संकटमोचन परिसरात राहणारे काँग्रेसचे यवतमाळ शहर अध्यक्ष  चंद्रकांत चौधरी  यांच्या घरात जुगाराचा  रंगला होता. अवधूतवाडी पोलिसांना  याची माहिती मिळताच पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 14 जणांना अटक  केली. या कारवाईमुळे यवतमाळ शहरात  प्रचंड खळबळ उडाली असून 6 लाख 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
यवतमाळ नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रकांत हरिकिशोर चौधरी यांच्या फ्लॅटमध्ये जुगार सुरु होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून मधुकर प्रेमचंद गावंडे (रा. अंबानगर), राजकुमार केशवराव बनसोडे (रा. कोलुरा, ता. नेर), सुभाष राजाराम वानखेडे (रा. अंबानगर), दीपक बापूराव थोरात (रा. दारव्हा रोड), विजय अशोकराव सुरस्कर (रा. जयविजय चौक), उमेश रमेश उपाध्ये (रा. देवीनगर), श्रीकांत मारोतराव बावणे (रा. साईनगर), राजबहाद्दूर किशोरीलाल राजपूत (रा. शारदा चौक), अल्पेश रणजित फुलझेले (रा. उमरसरा), शेख हकीम शेख करीम (रा. गिलाणीनगर), नितीन डोमाजी चव्हाण (रा. कावेरी पार्क), दर्शन रमेश कोठारी (रा. दाते कॉलेज चौक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी छापा टाकताच तेथून 2 लाख 15 हजार 870 रुपये रोख, 14 मोबाईल, 8 दुचाकी, असा एकूण 6 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी अवधूतवाडी पोलीसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.