गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (16:11 IST)

आगामी सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार; भाजपाच्या बैठकीत आवाहन

BJP will contest all upcoming elections on its own; Appeal to BJP meeting Maharashtra News Regional Marathi  News
जळगाव  आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूका भाजपा स्वबळावर लढणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन बोदवड येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी पक्षाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा व समर्पण’ अभियानाचा आढावा घेण्यात आला.
 
भारतीय जनता पार्टीची बोदवड तालुक्याची ‘विस्तृत आढावा बैठक’ मंगळवार दि.५ रोजी माजी मंत्री आ.गिरिष महाजन, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, खासदार रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन, बुथ रचना व आगामी निवडणूक यासारख्या विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.