बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (11:55 IST)

मुसळधार पावसाचा कहर: पुराच्या पाण्यात वाहून गेली 60 जनावरे

राज्यात पावसाने कहर केला आहे.राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसाने थैमान मांडला आहे.पावसामुळे जनधनाचे नुकसान झाले असताना  यवतमाळच्या महागावातून  एक दुर्देवी घटना समोर आली आहे. इथे देखील पावसाचे संकट कायम आहे. काल झालेल्या पावसामुळे नाल्याला पूर आला आहे. सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. अशा परिस्थिती मध्ये शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आहे. शेतकऱ्यांचे पिके देखील या पुरात वाहून गेली आहे.या गावात पुराच्या पाण्यात सुमारे 60 ते 70 जनावरे वाहून गेल्याचा हृदयद्रावक व्हिडीओ समोर आला आहे.

दोन दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाने पुन्हा झडी लावली होती. त्यात पाऊस नसल्याने बेलदारी गावातून एक व्यक्ती आपल्या गाय गुरांना चारण्यासाठी घेऊन गेला.तेवढ्यात गावातील नाल्याला पूर आला.नाला ओलांडताना पुराला पाणी जास्त असल्यामुळे एकापाठोपाठ त्याची सर्व जनावरे वाहून गेली. काहींना वाचविण्यात यश आले आहे.मात्र या पुरात 60 ते 70 जनावरे वाहून गेली आहे. हा व्हिडीओ  एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या घटने मुळे शेतकऱ्याचे  खूप मोठे नुकसान झाले आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे