Festival Posters
✕

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणार असा निधी

Updated: मंगळवार, 27 जुलै 2021 (22:34 IST)
 
अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये १ हजार १२९ पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत.त्यापैकी काही योजनांना तातडीने सुरू करण्यासाठी डिझेल जनरेटरची व्यवस्था,क्लोरीनेशन करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, बोरवेलची किरकोळ दुरुस्ती,पंपाची दुरुस्ती, पाणीपुरवठा लाईन दुरुस्त करणे या बाबींसाठी ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी तत्काळ लागणार आहे. तर जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ३१ कोटी ६५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असे एकूण ४२ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च या योजनांसाठी लागणार आहे.
 
तातडीची बाब म्हणून जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासन त्यांच्या उपलब्ध निधीतून कामे सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भात महसूल तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी किरकोळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा करणे शक्य आहे तेथे तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तथापि वीज पुरवठा खंडित झालेला असल्यामुळे ज्या पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा करता येत नाही अशा ठिकाणी स्थानिक स्रोतांमधून (बोअरवेल,विहीर) द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

एसआयआर आणि ईव्हीएमच्या विरोधात मुंबईत 'विराट गर्जना मोर्चा'; राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले

भाजपने महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; नाशिकमध्ये संत निवृत्तीनाथ संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध एफआयआर

LIVE: महाराष्ट्र सरकार राज्यभरातील सरकारी शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवणार

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी; ८५ पैकी २९ पदकांमध्ये रिलायन्स फाऊंडेशनचे योगदान, नीता अंबानींकडून अभिनंदन

पुढील लेख
Show comments