शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (22:10 IST)

नाशिक शहरात या दोन दिवशी पाणी पुरवठा नाही

नाशिक शहरात २२ आणि २३ मे रोजी पाणीपुरवठा बाधित होणार आहे. महावितरणकडून वीज वाहिनीच्या होणाऱ्या कामामुळे हा पाणीपुरवठा बाधित होणार आहे, तशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
 
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मनपाचे गंगापूर धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडून १३२ के.व्ही. सातपूर आणि १३२ के.व्ही. महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. तसेच मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आला आहे. सदरचे केंद्रांवरील महावितरणकडून ओव्हरहेड लाईनची पावसाळी पुर्व कामे केली जाणार आहेत. त्यासाठी २२ मे रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपावेतो वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
 
सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पुर्ण शहराचा पाणीपुरवठा २२ मे रोजी बंद ठेवून उपरोक्त नमूद कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे  मनपाचे गंगापूर धरण व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा २२ मे रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच २३ मे रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, असे महापालिकेने कळविले आहे.