1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Brutal rape of a woman in a Ghaziabad society

पतीने पत्नीसमोर मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करत २४ लाख रुपये आणि सोने हिसकावून घेतले

उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद सोसायटीत एका महिलेवर निर्घृण बलात्कार झाला. यात आरोपीच्या पत्नीनेही त्याला साथ दिली. आरोपी या घटनेचा व्हिडिओ दाखवून पीडित महिलेला ब्लॅकमेल करत असे, असा आरोप आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार गाझियाबाद सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेने मैत्रिणीच्या पतीवर बलात्कार आणि ब्लॅकमेल करून २४ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे, तसेच २५ तोळे सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. यामध्ये आरोपीच्या पत्नीनेही त्याला साथ दिली आणि घटनेचा व्हिडिओ बनवला.
आरोपी तरुण व्हिडिओ दाखवून पीडित महिलेला ब्लॅकमेल करत असे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
धक्कादायक !मुंबईत नातवाने कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले