गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (21:53 IST)

Gautami Patil: गौतमी पाटील लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार

Gautami Patil: गौतमी पाटीलला महाराष्ट्रात लावणी क्वीन म्हणून ओळखतात. गौतमीच्या नृत्यावर तरुणाई थिरकतात तिच्या नृत्यावर आणि तिच्या सौंदर्यावर तरुण वर्ग फिदा आहे. तिच्या नृत्याने तिने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भली-मोठी गर्दी असते. तिच्या कार्यक्रमात मग तो कुठे ही होत असला गोंधळ होतो. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. तर काही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. 

आता गौतमी पाटील ने एक मोठी घोषणा केली आहे. ती आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.आता ती मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असून तिच्या चित्रपटाचे नाव घुंगरू आहे. या चित्रपटात तिची भूमिका काय आहे. हे अद्याप तिने सांगितली नाही. या चित्रपटातून कलाकार आणि लोककलावंतांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या चित्रपटाचं शूटिंग सुरु आहे. शूटिंग पूर्ण झाल्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारखेची घोषणा केली जाईल. चित्रपटाला प्रेक्षकांनी आवर्जून बघण्याचे आवाहन गौतमीनं केले आहे. 
 
Edited by - Priya Dixit