शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (20:49 IST)

महाराष्ट्राला सोन्याचे दिवस..सापडल्या सोन्याच्या खाणी

Gold mine
महाराष्ट्रात सोन्याचे दिवस लाभणार असून राज्यात ठीक-ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत. चंद्रपूर आणि भंडारा आणि नागपूरमध्ये सोन्याच्या खाणी  सापडल्या असून यामुळे आता महाराष्ट्राला सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आहे. आधी चंद्रपूर आणि भंडारा पाठोपाठ आता नागपूरतही सोन्याचे साठे आढळले आहेत. तसा अहवाल भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी  देखील याबद्दल माहिती देत सांगितले होते की, मंत्री भाग्यवान आहोत, आमच्या कार्यकाळात सोन निघतंय, हे मोठ यश आहे.
 
भूगर्भ सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षण केले. त्यात सुखद माहिती समोर आली. आधी चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यात सोन्याचे साठे असल्याचे सर्वेक्षणात म्हंटले होते. आता राज्याच्या उपराजधानीतही सोन्याचे साठे आढळल्याने आनंदाचे वातावरण आहे. नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील परसोडी, किटाळा आणि मरुपार या गावांच्या खाली सोन्याचे साठे आहेत.
 
मात्र, त्याचं प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. याशिवाय इतर मौल्यवान धातुसाठा असल्याचे सर्वेक्षणातुन पुढे आले आहे. जिल्ह्यात सोन्याचे साठे आढळले असले तर ते कमी प्रमाणात असल्याने लिलाव होतो का नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.
 
महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या दोन सोन्याच्या खाणी सापडल्या. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली . महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor