Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारी कर्मचा-यांचा 14 डिसेंबरपासून संप

Updated: सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (08:49 IST)
 
पुरेशी संधी देऊनदेखील सरकार निर्णय घेत नसल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागत आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा कर्मचारी शिक्षक समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर यांनी अलिबाग येथील निर्धार सभेत केले आणि हा संप यशस्वी करण्याचा एकमताने निर्धार केला. जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करा, अशी प्रधान मागणी व इतर 17 प्रलंबित मागण्यांसाठी 14 मार्च 2023 पासून 20 मार्च 2023 पर्यंत कर्मचारी-शिक्षकांनी संप केला. राज्याच्या मुख्यमंत्री यांचा मान ठेवून कर्मचारी शिक्षकांच्या सुकाणू समितीने बेमुदत सुरू केलेला हा संप स्थगित केला.
 
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला सहा महिने उलटून गेले. जुनी पेन्शनसाठी नेमलेल्या अभ्यास समितीने तीन महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित असताना मुदतवाढ घेऊनदेखील अद्याप शासनाकडून सदर समितीचा अहवाल जाहीर केला नाही. सरकारकडून कर्मचारी शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाही. उलट शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सेवा देणे हे सरकारचे कर्तव्य असताना सरकार यावरील खर्च कमी करून खासगीकरण व कंत्राटीकरण करू पाहात आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: ठाण्यात लवकरच प्रीपेड ऑटो सेवा सुरू होणार

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ज्येष्ठ नेते शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले

अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाच्या उप-वर्गीकरणाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये एल्गार महा मोर्चा,हजारो आंदोलक रस्त्यावर

ठाण्यात लवकरच प्रीपेड ऑटो सेवा सुरू होणार

पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुणीची सहकारी तरुणांनी केली फसवणूक, गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments