Festival Posters
✕

भीमा-कोरेगावच्या घटनेला सरकारची स्पॉन्सरशिप होती का?- धनंजय मुंडे

Updated: गुरूवार, 1 मार्च 2018 (10:12 IST)
 
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की हे ज्यांच्यामुळे घडले, त्यांना सरकार अटक करत नाही. सरकार त्या दोन व्यक्तींसमोर किती हतबल झाले आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. दंगलीच्या घटनेला प्रतिक्रिया म्हणून लोकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. या वेळी राज्यभर कोम्बिंग ऑपरेशनही राबवले गेले. औरंगाबाद येथे एका निष्पाप गरोदर महिलेवर स्वतः पोलीस आयुक्तांनी कारवाई करत अत्याचार केल्याची माहिती मिळाली आहे.
 
भीमा-कोरेगावचा प्रश्न गंभीर असून यावर आ. अॅड. जयदेव गायकवाड  यांनी विधानपरिषदेत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला आहे आणि सरकारतर्फे ठोस उत्तर मिळावे, अशी अपेक्षा केली आहे. पण, या प्रश्नाचा निकाल प्रश्नोत्तराच्या तासातच लावावा, हे सरकारमधील सदस्य सांगत आहेत. हे अतिशय दुःखद आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.
 
गेल्या दोनशे वर्षांपासून असंख्य लोक भीमा कोरेगावला संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेत असतात. मात्र या वर्षी काही समाजकंटक घटकांनी तिथे जमलेल्या अनुयायांवर पूर्वनियोजित भ्याड हल्ला केला. एका तरुणाचा मृत्यू झाला. घटनेला दोन महिने उलटूनही अद्याप हल्लेखोर आणि सूत्रधारांना अटक झालेली नाही. याबाबत शासन काय कारवाई करत आहे? याबाबत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून सरकारला अॅड. आ. जयदेव गायकवाड यांनी जाब विचारला.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

मी माझ्या गावी जात आहे, सुटकेनंतर अभिजीत दीपकेची पोस्ट, सीजेपी मागे हटणार नाही

LIVE: नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रोन पाळत आणि सहा ठिकाणी नाकाबंदीसाठी

मुंबईतील सांताक्रूझमध्ये लग्नाच्या खरेदीसाठी ठेवलेले १० लाख रुपये चोरून कारचालक फरार

नेपाळमधील बुढी गंडकी नदीसाठी पुराचा इशारा, गावे रिकामी करण्याचे आदेश, अनेक घरे आणि पूल वाहून गेले

देवबंदमध्ये भीषण रस्ते अपघात; कुशावली येथील चार भाविकांचा मृत्यू, १२ जण जखमी

पुढील लेख
Show comments