सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (21:04 IST)

गुलाबराव पाटील म्हणाले, मला कोणी बिग बॉसमध्ये बोलावले तर नक्कीच जाईल

जर मला कोणी बिग बॉसमध्ये बोलावले तर नक्कीच ‘बिग बॉस’मध्ये जाईल, असे उत्तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांना उत्तर दिले आहे. बिग बॉस मराठीचे चौथे सिजनच्या पार्श्वभूमीवर बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी एका मुलाखती दरम्यान त्यांनी गुलाबराव पाटील यांचे नाव घेत, हे बिग बॉसच्या घरात आल्यास बिग बॉसची टीआरपी आणखी वाढेल, असे सांगितले होते.
 
बिग बॉस मराठीचे चौथे सीजन येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या बिग बॉसमध्ये काही बदल करण्यात आले असून, कोणत्या सदस्यांना घरामध्ये स्थान दिले जाणार हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर बिग बॉसचे सुत्रसंचालक महेश मांजरेकर यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी एका मुलाखती महेश मांजरेकर यांना कोणत्या राजकीय व्यक्तींना बिग बॉसमध्ये सहभागी होणे आपल्याला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता.
 
या प्रश्नावर उत्तर देताना मांजरेकर यांनी, नितेश राणे, अमोल मिटकरी यांच्यासह पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव घेत, जर हे नेते बिग बॉसच्या घरात आले. तर बिग बॉसची टीआरपी आणखी वाढेल असे मांजरेकरांनी सांगितले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor