Marathi Biodata Maker
✕

नाशिक जिल्ह्यातील “या” तालुक्यात एच३एन२ फ्ल्यूचा रुग्ण; परिसरात भीतीचे वातावरण

Updated: सोमवार, 27 मार्च 2023 (08:08 IST)
 
नाशिक शहरात गत महिन्यात 4 रुग्ण एच३एन२ फ्ल्यू बाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे आता जिल्हयाच्या एच३ एन२ बाधित फ्ल्यूचे रुग्ण फेब्रुवारी महिन्यात २ तसेच मार्च महिन्याच्या पूर्वार्धात २ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. चारही रुग्ण शहरातच आढळल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार होऊन ते बरेदेखील झाले होते.

मात्र, काल  आढळलेला ग्रामीण भागातील पहिला आणि नाशिक जिल्हयातील पाचवा रुग्ण हा निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंतचा आहे. मूळ परराज्यातील रहिवासी असलेल्या या नागरिकाची तपासणी केली असता तो एच३ एन२ बाधित असल्याचे आढळले. त्यामुळे त्याला नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

एच३ एन२ फ्ल्यू आजारात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदूखी, जुलाब, उलटी, यातील काही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या आजाराकडे केवळ साधा फ्ल्यु म्हणून दूर्लक्ष करु नये, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
या आजारात तीन टप्पात रुग्णांवर इलाज केला जातो. प्राथमिक तपासणीतून औषधोपचार करुन घरी पाठवणे, रुग्णालयात दाखल करुन उपचार करणे आणि गंभीर लक्षणे आढळल्यास व्हँटीलेटरच्या आधाराने उपचार करणे आवश्यक ठरते.

प्रत्येक एच ३ एन २ हा बहुतांशरित्या घातक आजारात मोडत नसला तरी संसर्गजन्य असल्याने याबाबत काळजी घेणे गरजेचे ठरते. एच3 एन2 या आजाराबाबत लोकांनी घाबरुन न जाता वैद्यकिय उपचार तातडीने घ्यावे. घरगुती इलाजात वेळ घालवू नये हा संसर्गजन्य आजार असल्याने घरात पसरु शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यविभागाने केले आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

CJP आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदेकडे

दिल्लीतील आंदोलकांच्या अटकेमुळे सोनम वांगचुक संतप्त, उपोषण आणि पायी मोर्चाचा इशारा

तुम्ही हवे तितके पोलीस बोलवा, आम्ही मागे हटणार नाही..." - राहुल गांधींचा मोदी सरकारवर मोठा हल्ला

सीजेपी आंदोलनात दिपके, ममता बॅनर्जी आणि केजरीवाल ताब्यात

बीएमसीने मुंबईच्या 'ए' वॉर्डमध्ये 'हॅलो ए वॉर्ड' नावाचा एआय-आधारित चॅटबॉट सुरू केला

पुढील लेख
Show comments