शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 मार्च 2023 (10:45 IST)

संजय राऊतां विरोधातील हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग

sanjay raut
संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यानंतर राऊतां विरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करण्यात आलं आहे.
 
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच संजय राऊतांचा खुलासा समाधानकारक नाही, असेही ते म्हणाले. लोकसत्तानं ही माहिती दिली आहे.

“संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगासंदर्भात खुलासा देण्यासाठी 20 मार्चपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. याबाबत त्यांनी खुलासा सादर केला आहे. त्यांनी केलेल्या खुलासावर मी विचार केला. पण त्यांचा खुसाला समाधानकारक वाटला नाही. त्यामुळे याप्रकणात हक्कभंग झाला आहे, या निर्णयापर्यंत मी पोहोचलो आहे,” अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.
 
Published By - Priya Dixit