1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 मार्च 2023 (21:03 IST)

ठाकरे गटाच्या खासदाराला जिवे मारण्याची धमकी

sanjay jadhav
Twitter
परभणी: राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना सुरूच आहेत. त्यातचं आता परभणीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीनं खळबळ उडाली आहे.
 
दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना सुरूच आहेत. संजय जाधव यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना देखील धमकी देण्यात आली आहे.नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नितीन गडकरी यांना त्यापूर्वी देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस नितीन गडकरी यांना जयेश पुजारी या व्यक्तीच्या नावाने धमक्या आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.

 Edited by : Ratnadeep Ranshoor