मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (17:01 IST)

येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा धोका

रविवारपासूनच मुंबई, कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. रविवारी  काही वेळासाठी सूर्यनारायणाचं दर्शन झाल्यानंतर लगेचच काळ्या ढगांची चादर मुंबई आणि उपनगरांवर पसरल्याचं दिसून आलं. सायंकाळच्या सुमाराल या भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. 
 
कोकण किनारपट्टी भाग आणि उर्वरित परिसरातही पावसाचीउपस्थिती पाहायला मिळाली. तिथं रायगडमध्ये पावसानं चांगलाच जोर पकडला असून, अनेक गावांना याचा तडाखाही बसताना दिसत आहे. बंगालच्या खाडी परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. 
 
विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा पाऊस पोहोचला असून, जनजीवनावर याचे परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाची सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली.