शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (15:43 IST)

उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत : नितेश राणे

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर खोचक टीका केली आहे.उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर आहेत,असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यात त्यांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओत नितेश राणे यांनी म्हटलं आहे 'आमच्या कोकणाचे शक्ती कपूर आणि कोकणातील सचिन वाझे यांचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारं वैदयकीय महाविद्यालय, या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. पण या महाविद्यालला परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली,तसंच चीपी विमानतळासाठी विमानसेवा सुरु करण्याची परवानगीही नारायण राणे यांच्यामुळेच मिळाली असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
 
उदय सामंत कदाचित विसरले असतील महाविद्यालय आणि चिपी विमानतळासाठीच्या परवानग्या, मिळवण्यासाठी केंद्र सरकारमध्ये ताकद लागते, वलय लागतं, राणेसाहेब केंद्रीय मंत्री झाल्यानंतर चिपी विमानतळाला परवानगी कशी मिळाली, 2014 ते 2019 मध्ये शिवसेना पक्षाचे अरविंद सावंत हे कोकणाचे भूमिपूत्र आहेत,ते ही केंद्रात मंत्री होते, तेव्हा का परवानगी मिळाली नाही. तेव्हा तर शिवसेना भाजपमध्ये युतीत होतात, पण नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यावर परवानग्या कशा मिळतात असा सवाल करत घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा हे प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार करावा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.