Marathi Biodata Maker
✕

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज

Updated: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (08:58 IST)
 
पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार येत्या आठवडय़ात राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतरच्या आठवडय़ात पावसाचे प्रमाण कमी असेल, मात्र अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही.
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाला पोषक स्थिती असून, येत्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून (१९ सप्टेंबर) कोकण, मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
 
१८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या आठवडय़ात विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाची हजेरी लागू शकते. मात्र उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असेल. त्यानंतरच्या आठवडय़ात २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात केवळ कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याजवळच्या जिल्ह्यंमध्ये पाऊस असेल. इतरत्र पाऊस कमी होईल.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची आशा! युद्धानंतर दोन्ही देशांशी व्यापार करणार ट्रम्प म्हणाले

बॉलिवूडचे मुंबईतून बाहेर पडणे हे सरकारचे अपयश म्हणत हर्ष वर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

पीव्ही सिंधूने फ्रेंच ओपन २०२६ च्या अंतिम फेरीत स्थान मिळवले, पुढील सामना दक्षिण कोरियाच्या आन से यंगशी होईल

रायझिंग एशिया कप २०२६ चे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामना या दिवशी होणार

LIVE: नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावर वाहतूक १२ दिवस विस्कळीत राहील

पुढील लेख
Show comments