Marathi Biodata Maker

हॉस्पिटलमध्ये आढळले अवैध सोनोग्राफी मशीन

शनिवार, 17 डिसेंबर 2022 (21:56 IST)
नाशिक  शहरातील नाशिकरोड देवळलीगावात एका हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या सोनोग्राफी मशीन आढळून आले आहे. या घटनेने नाशिकच्या आरोग्य विभागात एकाच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे गर्भनिदान सुरू असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बापुसाहेब नागरगोजे यांच्या पथकाने सदर रुग्णालयात छापा टाकला असता या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आढळून आहे.
 
हे रुग्णालय डॉक्टर दाम्पत्याच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील महापालिकेच्या रुग्णालया यातील एक जण अस्थिरोग तज्ञ म्हणून कामकाज पाहत असल्याचीही माहिती आहे. महापालिकेचे डॉक्टर त्यांचा खाजगी हॉस्पिटलमध्ये अवैध रित्या मशीन बाळगतात ही बाब समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान या संदर्भात तपास सुरु असून डॉ नारगोजे यांनी माध्यमांशी बोलताना हे मशीन सील करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. शहरातीलच एका हॉस्पिटलच्या नावाने मशीनची नोंद आहे.
 
प्रसूतीपूर्व लिंग निदानासाठी होणा-या दुरुपयोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रसुतीपूर्व निदानतंत्र (विनीयमन व दुरुपयोगावरील प्रतिबंध) कायदा १९९४ लागू करण्‍यात आला. त्यानुसार लिंग निदान होईल अशा उपकरणांचा व तंत्राचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. अशात हे मशीन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या मशीनवर आत्तापर्यंत किती रुग्णांची तपासणी झाली, कोणकोणत्या तपासण्या झाल्या याचा तपास सुरु असून तपासाअंती दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असे डॉक्टर नागरगोजे म्हणाले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नाशिक-त्र्यंबकेश्वर संकट! मुख्यमंत्री फडणवीस यांनी ढगफुटीची भीती व्यक्त केली, मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी

मुंबईत १० व्या मजल्यावरून पडून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा; शाळा आणि महाविद्यालये बंद

LIVE: हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा

अमरावती न्यायालया कडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा

पुढील लेख