Marathi Biodata Maker

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम सहा दरवाजे उघडले

बुधवार, 18 जुलै 2018 (09:31 IST)
राज्यात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यात कोयना धरण सातारा येथे असून मोठय़ा प्रमाणात या भागात पाऊस कोसळत असून आहे. पावसाने जूनचा पूर्ण  अनुशेष जुलैमध्ये भरून काढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. २४ तासात तब्बल ७ टीएमसी पाण्याची वाढ झाली तर पाटण, कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले आहे. या धरणातून ५००० क्युसेस पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले. तसेच पायथा वीज गृहातुन २१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा वेग पाहता सध्या ७१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये केला जात आहे. कोयना धरणामध्ये ७८ टीएमसी पाणीसाठा आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. माण, खटाव व फलटण तालुके वगळता सर्वत्र पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

महाराष्ट्रातील आजचे हवामान: कोकणात मुसळधार पाऊस आणि विदर्भात जोरदार वादळाचा इशारा जारी

ठाण्यात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतांना स्कूटर कंटेनरला धडकली; दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस International Day of Innocent Children Victims of Aggression 2026

LIVE: पुणे-मुंबई कॅब प्रवासाला महागाईचा फटका

अमरावतीमध्ये एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला

पुढील लेख
Show comments