लातूर गंजगोलाई १०० वर्षे पूर्ण मनपा करणार विकास
मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर असलेल्या लातूर मधील वैशिष्ट्यपूर्ण गंजगोलाई संकुलाला यावर्षी २०१७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या संकुलाचा आता विकास केला जाणार आहे. विकासाचा आराखडा मनपाने तयार केला असून या संकुलाला जोडल्या गेलेल्या १६ रस्त्यांचाही विकास होणार आहे . तर मनपा ने केलेल्या नवीन धोरणा नुसार संकुल आणि १६ रस्त्यांचे सुशोभिकरणही केले जाणार आहे. यासाठी सात कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे.