Daily Horoscope
✕

चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात गुंडांचा वावर, राष्ट्रवादीचा आरोप

Updated: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (08:16 IST)
 
प्रशांत जगताप म्हणाले, सुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जणू पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय, भाजप पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, हेही स्पष्ट होत आहे. कुख्यात गुंड दीपक गागडे व नाना मोघे हे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत यापूर्वी कार्यक्रमांत दिसून आले आहेत. विशेष म्हणजे तडीपार असताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या गुंडांची उपस्थिती होती. मंगळवारीही पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. या घटना पाहता चंद्रकांत पाटील पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने नेऊ पाहात आहेत, शांत पुण्याला अशांत करण्याचा प्रयत्न का करीत आहेत.
 
भाजपकडून आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक अशा गुंड प्रवृत्तीवरच लढवली जाणार आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुणे शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

अमेरिकेत मेटावर २.३५ ट्रिलियन डॉलर्सचा दंड; डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०१६ च्या निवडणुकीशी संबंधित प्रकरण

LIVE: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा! कल्याणमध्ये कारच्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नवजात बाळ ३.५ लाख रुपयांना विकले, अमरावतीत रुग्णालय सील, डॉक्टरला अटक

बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या हस्ते उद्घाटन होणार

पुढील लेख
Show comments