1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (16:22 IST)

महाविकास आघाडीच्या नेत्यांना नुसत्या खुर्च्या उबवू नका, तर भाजपला सडेतोड उत्तर द्या

Don't just give chairs to the leaders of Mahavikas Aghadi
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमधील नेत्यांवर, मंत्र्यांवर भाजपचे नेते भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना नुसत्या खुर्च्या उबवू नका, तर भाजपला सडेतोड उत्तर द्या, असं आवाहन केलं आहे. तसंच, किरीट सोमय्या यांना काश्मीरमध्ये पाठवा, असं देखील राऊत म्हणाले.
 
संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांना आवाहन केलं. महाविकास आघाडीतल्या सगळ्याच मंत्र्यांना आवाहन आहे, की नुसतेच खुर्च्यांवर बसु नका. प्रति हल्ले करा, टोल्याला टोला , हे आठ दिवसात पळून जातील, असं राऊत म्हणाले.
 
महाराष्ट्रात कारवाया करणाऱ्या ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरमध्ये पाठवा. त्या खूप पॉवरफूल आहेत. अतिरेकी पळून जातील. तुम्ही इथे आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआय, एनसीबी आणि आयटीच्या माध्यमातून आमच्या सरकारवर हल्ले करताय. तुम्ही या सरकारच्या संस्था बदनाम केल्या आहेत. राजकीय गैरवापराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पाठवा यांना काश्मीरमध्ये. किरीट सोमय्या यांना काश्मीरमध्ये पाठवा. सोमय्या यांना अतिरेक्यांचे थोडेसे कागदपत्रे देऊ फिरत बसतील, जम्मू काश्मीर, असं राऊत म्हणाले.