suvichar
✕

‘वायसीएमएच’मध्ये ऑक्सिजनची गळती:

Updated: गुरूवार, 10 जून 2021 (08:26 IST)
 
पिंपरी संत तुकारामनगर येथे महापालिकेचे वायसीएम रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी महापालिकेकडून ऑक्सिजन पुरवठादारांकडून ऑक्सिजन घेतला जातो. टँकरमधून ऑक्सिजन आणून तो ऑक्सिजन प्लांट, जम्बो सिलेंडरमध्ये भरला जातो.
 
टँकरमधून प्लांटमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरला जात होता. त्यावेळी टँकरचा सेफ्टी ऑल खराब झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे ऑक्सिजन वाया गेला. त्याची नासाडी झाली. त्यानंतर टँकरचा पंप बंद केला. तो दुरुस्त करुन पुन्हा ऑक्सिजन प्लांटमध्ये सोडण्यात आला.
 
याबाबत ‘वायसीएम’चे डॉ. विनायक पाटील म्हणाले, ”टँकरमधून ऑक्सिजन प्लांटमध्ये सोडत असताना वॉल सटकला होता. तो दुरुस्त करुन ऑक्सिजन प्लांटमध्ये टाकला. तत्काळ बंद केल्याने ऑक्सिजन वाया गेला नाही”.
 
महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, साडे सातच्या सुमारास जेव्हा वायसीएम येथील एका टाकीमध्ये एलएमओ भरला जात होता. तेव्हा टाकीच्या दाबात चढ-उतार झाल्यामुळे दबाव कमी होता. जास्तीत जास्त दाब चालविण्यासाठी व सोडण्यासाठी असलेले सेफटी झडप खराब झाले. पर्यायी सुरक्षित वाल्व्ह त्वरित वापरण्यासाठी ठेवले होते. तथापि, ही टाकीची सुरक्षा यंत्रणा असल्याने टाकीमधून कोणतेही नुकसान झाले नाही किंवा प्रत्यक्ष गळती झाली नाही.
 
वायसीएममध्ये 300 आंतररूग्ण आहेत आणि त्यात दीड तासाचा बॅक अप आहे. ज्या टँकमधून हा प्रेशर सोडला गेला होता तो ओ2 ते 30 बेडचा आयसीयू आणि100 रूग्ण असलेल्या रुग्णालयाच्या एका मजल्याचा पुरवठा करत होता. ऑक्सिजन सुविधेचे सीओईपीच्या बायोमेडिकल विभागाने ऑडिट केले.  सध्या रुग्णालयातील सर्व रुग्ण व टाक्या सुरक्षित आहेत. मी या ठिकाणी भेट दिली आणि त्याची खात्री केली आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

इन्स्टाग्रामवर रील बघून शॉपिंग करणे पडले महागात; नाशिकच्या तरुणीने ६०० रुपयांच्या ड्रेससाठी गमावले ९९ हजार रुपये

पुण्यातील पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला संपवले; महिलेसह आई-वडील आणि दोन भावांना जन्मठेप

हिंगोलीत भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही

नंबर-१ स्कूटर! ३१ दिवसांत १.६५ लाख ग्राहकांनी खरेदी केली TVS ची ही स्कूटर; पाहा इतर मॉडेल्सची विक्री

मुंबई: उद्यानात जोडप्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल; ८ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून धरपकड

पुढील लेख
Show comments