बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (22:58 IST)

असा मिळेल पुणे महापालिकेकडून घरच्या घरी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने पूर्व तयारी केली आहे त्यानुसार आता गरज असल्यास नागरिकांना घरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
 
कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता पुणे महापालिकेने मोठ्या प्रमाणावर मिळालेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांचा वापर लायब्ररीच्या स्वरुपात कारणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्या रुग्णांना घरी ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरची गरज भासते अशांसाठी काही अटी व शर्ती निश्चित करून पुणे महापालिकेकडून त्यांना विनामूल्य ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी दिला जाणार आहे.
 
त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णाची राहणाऱ्या पत्त्यासह पूर्ण माहिती आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरून झाल्यानंतर पुन्हा उत्तम स्थितीत परत करण्यासाठीचा हमीपत्र, इतक्या गोष्टींच्या आधारावर विनामूल्य हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत.
 
अटी व शर्ती खालीलप्रमाणे –
 
नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन
 
रुग्णाचा कोविड पॉझिटीव्ह रिपोर्ट किंवा संशयित कोविड
 
घरी डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी किती दिवसांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करण्यास सांगितला आहे इ. इत्तंभुत माहिती
 
रुग्णांचे हमीपत्र (पुरविलेल्या नमुन्यात)
 
रुग्णांचा संपुर्ण निवासी पत्ता व त्याचा पुरावा, इलेक्ट्रिक बिल व आधार कार्ड