Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Budget 2020: स्थानिकांना रोजगार देण्यासाठी मोठी घोषणा

Updated: शुक्रवार, 6 मार्च 2020 (13:08 IST)
 
मुद्रांक शुल्कात सवलत
घर स्वस्त होतील... सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत जाहीर केली. याने मालमत्ता क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
 
२ लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आम्ही अटी नियमांशिवाय उभं करण्याचा प्रयत्न... कर्जमाफीसाठी एकूण २२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न... शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
 
स्थानिकांना रोजगार देण्यासाठीही मोठी घोषणा 
स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसंच राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना देण्यासाठी कायदा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह
नोकरदार मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त तृतीयपंथांसाठी मंडळ स्थापन करण्यात येणारआहे. यासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. 
 
महिला सुरक्षा हे सरकारचं प्राधान्य
महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.  प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसंच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
रोज १ लाख शिवभोजन थाळी देणार
रोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस आहे.  शिवभोजन थाळी केंद्रावर ५०० थाळी देणार. शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
मराठी माध्यमांच्या शाळांसाठी विशेष तरतूद 
जिल्हा परिषदांच्या शाळांचाही दर्जा वाढवणार... सर्व शाळांना इंटरनेटनं जोडण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून निर्माण करणार. 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

गोंदिया-बालाघाट रस्त्यावर भीषण अपघात; ट्रक-पिकअप धडकेत तिघांचा मृत्यू, ११ जण जखमी

अरुणाचल प्रदेशात बिचोम परिसरात पहाटे भूकंप

१८६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या मलेशिया एअरलाइन्सच्या विमानात बिघाड, चेन्नईमध्ये आपत्कालीन लँडिंग

सार्वजनिक शौचालयात मजुराची मारहाण करून हत्या, मृतदेह गटारात फेकला

बारावीत ९५.७ टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्याने आत्महत्या केली; कारण जाणून धक्का बसेल

पुढील लेख
Show comments